Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या खा. मोहिते पाटील यांच्या सूचना

 प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या खा. मोहिते पाटील यांच्या सूचना

 



अकलूज (कटूसत्य वृत्त):- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना माढा तालुक्यातील, उजनी प्रकल्पग्रस्त व गावठाण पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेण्यात यावी म्हणून विनंती केली होती त्या अनुषंगाने आज कुर्डूवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.  

या बैठकीत उजनी धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्या, पुनर्वसन योजनेतील अडथळे, व नवीन पुनर्वसन धोरणांची अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर गावठाणांतील पायाभूत सुविधा, आणि आर्थिक मदतीचे विषय मांडण्यात आले.  

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचना केल्या. पुनर्वसनासंदर्भातील संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत म्हणून सांगितले.

या बैठकीस आ.अभिजीत पाटील,प्रांत विजया पांगरकर,पुनर्वसन प्रकल्प अधिकारी सुशांत बनसोडे, संबंधित खात्याचे अधिकारी,पुनर्वसन गावातील नागरिक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments