वडिलांच्या अफेअरमुळे दिशा ने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 28, 2025

वडिलांच्या अफेअरमुळे दिशा ने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद

 वडिलांच्या अफेअरमुळे दिशा ने आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद


मुंबई(कटूसत्य वृत्त):- दिशा सालियान आरोप प्रत्यारोपांचा फैरी होत असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं. याच आर्थिक तणावातून दिशा आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये मूलं आहे. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages