1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 28, 2025

1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार

 1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार

दिल्ली (वृत्त सेवा ):-1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे, बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होतील. एवढेच नाही तर डिजिटल बँकिंगमध्येही अनेक बदल दिसून येतील, ज्यामुळे सामान्य माणसाचा बँकिंग अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या नवीन नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि बँक फसवणूक रोखणे आहे. या बदलांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आरबीआयच्या सूचनांनुसार एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. 1 'बँकेच्या एप्रिल 2025 पासून आता तुम्ही महिन्यातून फक्त 3 वेळाच दुसऱ्या एटीएममधन मोफत पैसे काढ शकाल. यानंतर प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आता सर्व बँक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात एक निश्चित किमान शिल्लक ठेवावी लागेल. ही रक्कम बँक आणि शहरानुसार बदलू शकते. मेट्रो शहरामध्ये जास्त आणि ग्रामीण भागात कमी. जर तुम्ही निर्धारित रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दरमहा दंड भरावा लागू शकतो.

फसवणूक रोखण्यासाठी बँका पॉझिटिव्ह पे सिस्टम (पीपीएस) लागू करत आहेत. आता 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताना तुम्हाला चेक नंबर, तारीख आणि रकमेची माहिती बँकेला आगाऊ द्यावी लागेल. जर चेक सादर करताना  काही फरक आढळला तर पैसे देणे थांबवले जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages