Hot Posts

6/recent/ticker-posts

फताटेवाडी ग्रामपंचायतीत अपहार; सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

 फताटेवाडी ग्रामपंचायतीत अपहार; सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एनटीपीसीसारखा मोठ्या औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून भरीव उत्पन्नाचे साधन हाती असलेल्या दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या अपहारप्रकरणी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात त्यांच्यावर चार कोटी ४२ हजार ९१ हजार ९९३ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एनटीपीसी प्रकल्पामुळे फताटेवाडी ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये मोडली जाते. एनटीपीसी प्रकल्पाकडे मोठ्या प्रमाणावर असलेली मिळकतकर थकबाकी वसूल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकाचे राहणीमान बदलले होते. या ग्रामपंचायतीमध्ये मोठा अपहार झाल्याची तक्रार फताटेवाडी येथील रहिवासी विनोद रमेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागीय महसूल आयुक्त आणि राज्याच्या लोकायुक्तांकडे केली होती. त्याचा पाठपुरावाही चालविला होता. त्यानुसार चौकशी झाली. त्यात अपहाराचा प्रकार उजेडात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments