सोलापूरातील बंद असलेले जलतरण तलाव सुरू करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 18, 2025

सोलापूरातील बंद असलेले जलतरण तलाव सुरू करा

 सोलापूरातील बंद असलेले जलतरण तलाव सुरू करा



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरांमध्ये मार्कंडेय जलतरण तलाव सावरकर जलतरण तलाव व विजापूर रोडवरील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव असून सध्या सावरकर जलतरण तलाव काही प्रमाणात सुरू असून बाकीचे दोन्ही जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत आणि जलतरण तलावाची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर अनेक विद्यार्थी  पोहणे शिकण्यासाठी गर्दी करतात पण दोन्ही तलाव बंद असल्या कारणामुळे त्यांची गैरसोय होत आहे महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हे जलतरण तलाव बंद आहेत त्यामुळे तात्काळ आपण हे दोन्ही जलतरण तलाव सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत.
सोलापूर शहरात विजापूर रोडवर आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव  जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने बांधण्यात आलेला होता तो तलाव महानगरपालिकेने काही काळासाठी ताब्यात घेतला होता पण कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाला गळती लागून व त्याची दुरावस्था होऊन तो बंद आहे याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे संपर्क साधला असता त्यांनी असे उत्तर दिले की आम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करताना सुस्थितीत जलतरण तलाव हस्तांतरित केला होता  जर महानगरपालिकेला तो चालवणे होत नसल्यास आम्हाला आम्ही दिलेल्या सुस्थितीमध्ये तलाव आमच्याकडे वर्ग करावे तरच आम्ही तो जलतरण तलाव सुरू करू तर महानगरपालिकेने आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे तो जलतरण तलाव वर्ग केला आहे असे सांगितले दोघांच्या चालढकलीमध्ये सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत असून तात्काळ जलतरण तलाव सुरू केल्या संभाजी ब्रिज स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले संपर्कप्रमुख छत्र गुण माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर लखन पारसे अकबर शेख संघटक शेखर स्वामी राजेंद्र माने उपाध्यक्ष सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर सिद्धाराम साबळे आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages