ग्रंथालयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन : खा. अमर काळे
वर्धा (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक समस्या आहेत. मी खासदार म्हणून आपल्या सोबत राहीन. पण त्या मागण्यांचा पाठपुरावा आपण करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन खा. अमर काळे यांनी वर्धा येथे झालेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशन उद्घाटन प्रसंगी काढले. वाचन संस्कृती टिकली पाहिजे, वाचनाने व्यक्ती ज्या देशात राहतो तो देश, भाषा, सांस्कृतीक व वैचारिकदृष्ट्या समृद्ध असतो. ग्रंथालय कर्मचारी आत्महत्या करतात हे ऐकून मन खिन्न झाले. ही खूप मोठी शोकांतिका आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी आपल्या सोबत राहीन असे उद्गार खासदार यांनी काढले.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार,कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, प्रभारी ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ग्रंथालय संघाचे कार्यपाध्यक्ष राम मेकले, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, जिनदार भीमराव पाटील,सहाय्यक रामदास साठे ग्रंथालय संचालक,रामदास साठे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, डॉ. श्रीपाद जोशी प्रा. डॉ.नारायण निकम आदी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन लोक महाविद्यालय, वर्धा, येथून शिवकुमार शर्मा, कुंडलिक मोरे, विदर्भ
साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, यांचे शुभ हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडीने
सुरुवात केली अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ग्रंथालय संगणक व इंटरनेट सुविधा यावर
डॉक्टर देवेंद्र भोंगाडे डॉक्टर मंगला हिरवाडे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तिसऱ्या
सत्रामध्ये ग्रंथालय व्यवस्थापन आणि नियोजन यावर किशोर दुमणे, दिलीप कोरे दीपक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाच्या मुख्य उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात राजेंद्र मुंडे, नारायण निकम, अॅड.राम हरपळे, डॉ. श्रीपाद जोशी, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर इत्यादींनी
आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी केले. ५९ वे वार्षिक अधिवेशन - २०२५ उद्घाटन समारंभ १५३१अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात अभ्यासिका, बालविभाग, स्त्री विभाग सक्षम होणे काळाची गरज यावर चंद्रकांत जोशी, चंद्रकांत जोशी, भाऊसाहेब पत्रे, प्रभाकर कापसे यांनी आपले विचार
मांडले. दुसऱ्या सत्रात ऑनलाईन पूर्तता बदल अहवाल यावरती गणेश काकांनी (सीए) आणि
नंदू बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले. तिसऱ्या सत्रामध्ये राजा राममोहन रॉय ग्रंथालय
प्रतिष्ठान योजना आणि प्रस्ताव यावर सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे आणि प्रभाकरराव घुगे यांनी परिपूर्ण असे मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रामध्ये सार्वजनिक कर्मचारी ग्रंथालयाच्या अडीअडचणी,वेतनश्रेणी, ग्रंथालय अनुदानात वाढ,वर्ग बदल आणि नवीन ग्रंथालयाला मान्यता यावर डॉ.गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. खुल्या अधिवेशनात ग्रंथालयांचे अनुदान तिप्पट, इमारत, जागा,वर्ग बदल, राज्य ग्रंथालय परिषद, लाईट बिल,इमारत बांधकाम, नवीन ग्रंथालय मान्यता इत्यादी अनेक विषयावरती ठराव होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. उपस्थित ५० महिला प्रतिनिधींना पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष मा . ग्रंथमित्र डॉ. गजानन कोटेवार यांनी अधिवेशनाचे आयोजन अतिशय आखीव खीव नीटनेटके केले होते.महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार पुणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
0 Comments