सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 31, 2025

सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : सावंत

 सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : सावंत


अनिल सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नंदेश्वर (कटुसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील महाविकास आघाडी एकसंघ ठेवत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनसंपर्क कार्यालयातून प्रयत्न होणार असल्याचे मत भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी व्यक्त केले. शिवप्रेमी चौक, मंगळवेढा येथे अनिल सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, श्री. संत दामाजी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शिरणांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, पं. स. माजी सदस्य नितीन पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, फिरोज मुलाणी, चंद्रकांत गरंडे, पैलवान दामोदर घुले, नारायण गोवे, दामाजी शुगरचे माजी संचालक बळवंत पाटील, सुरेश कांबळे, सुदर्शन महाराज, स्मिता अवघडे, नागणे, सावजी आदीजन उपस्थित होते.
अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, जनतेच्या सुख दुःखात आम्ही कायम सोबत असणार आहोत. येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून मिसळून जनतेची कामे मार्गी लावणार आहोत. राहुल शहा बोलताना म्हणाले, गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने आम्ही लढत दिली आहे. आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका सर्वांनी मिळून लढायच्या आहेत. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले यांनीही मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages