Hot Posts

6/recent/ticker-posts

शौर्य जिजाऊंचे शौर्य जिजाऊंचे

 शौर्य जिजाऊंचे 

ज्यांच्यामुळे सारा इतिहास घडला ,

आणि ज्यांनी त्यांच्या साक्षीने इतिहासच लढवला,

त्यांना माझा पहिला मानाचा मुजरा...!

डोळ्याची पापणी नव्हती ती डोळ्याचा  पारण होते,

नुसता स्वतःचा पुत्र नव्हता स्वराज्याचा बाणा होता!

जिजाऊंच्या डोळ्यातच होती तळपती तलवार,

अहो त्यांचे डोहाळे होते ढाल आणि  दांडपट्टा!

इंग्रजांची दुसरी कहाणी 

म्हणजे तिचं नावच झाशीची राणी

तिच्या पाठीला नव्हतीच कधी ढाल

तीही देशासाठीच लढली.

डोळ्यात घेऊन काळ, 

आणि पाठीशी तहान बाळ!

जिने सन्मानित केले तिला गडाची धरणी

आणि रात्रीचा दिवस करून गड उतरली ती 'हिरकणी'

ज्यांना आई नाही ते त्यांना ओळखतात सिंधुताई म्हणून त्यांनी अमेरिकेचा नुसता पुरस्कार नाही घेतला तर महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातेच्या संस्कार ही जपला...!

ज्यांच्या नावातच फुले त्यांनी काट्यासारखं जीवन जगणं त्याला म्हणतात त्याग दुसऱ्यासाठी

हे खडतर पाऊल उचललं ते फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी...!

त्यांच्या शौर्याचा असतो सन्मान

अशा या रणरागिनींना माझाच नाही तर साऱ्या महाराष्ट्राचा सलाम...!

तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जावो हीच सदिच्छा!

महिला दिनाच्या शिवमय शुभेच्छा!

             कवयत्री - मयुरी बाबर

                   (9112443343)

Reactions

Post a Comment

0 Comments