सोलापूर ग्रंथोत्सवाचे 9 व 10 मार्च रोजी आयोजन.
सोलापूर (कटूसत्यवृत्त):-नागरिकांमध्ये वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतीवर्षी ग्रंथोत्सव हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या मार्फत सोलापूर ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे रविवार दिनांक 09 व 10 मार्च, 2025 रोजी करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सव निमित्त रविवार 09 मार्च, 2025 रोजी सकाळी 9.30 वा. ग्रंथ दिंडीचे आयोजन केले आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ श्रीमती अंजली मरोड , उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते व रणजित कदम, जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर महाविदयालय, सात रस्ता चौक, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उज्वलकुमार माने, नितीन वैद्य, विजयकुमार पवार व पांडुरंग सुरवसे यांची उपस्थिती लाभणार आहे.
सोलापूर ग्रंथोत्सव 2024 चा
उद्घाटन समारंभ
देविदास सौदागर, साहित्य अकादमी पुरस्कार
विजेते यांच्या शुभहस्ते व अनंत राऊत, सुप्रसिध्द कवी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जयकुमार गोरे, मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज्य, महाराष्ट्र
राज्य तथा
पालकमंत्री सोलापूर
जिल्हा यांच्या
विशेष उपस्थितीत
सकाळी 11.00 वा.
शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर येथे
संपन्न होणार
आहे. या
प्रसंगी सोलापूर
जिल्ह्यातील सर्व
सन्माननीय खासदार,
आमदार व जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद,
ग्रंथालय संचालक, अशोक
गाडेकर, सहायक
ग्रंथालय संचालक
श्रीमती शालिनी
इंगोले, निवासी
संपादक दै.लोकमत सचिन जवळकोटे,
साहित्यिक,डॉ.
शिवाजीराव देशमुख,
शिक्षणाधिकारी, सचिन जगताप,
कार्याध्यक्ष, राज्य
ग्रंथालय संघ
गुलाबराव
पाटील, आदी
मान्यवर प्रमुख
अतिथी म्हणून
उपस्थित राहणार
आहेत.
उद्घाटन समारंभानंतर दु.
1.00 वा. मराठी
भाषा: सवंर्धन
व जबाबदारी या विषयावर
डॉ. राजशेखर
शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली होणा-या
परिसंवादात डॉ. शिवाजी
शिंदे, प्रा.
हरिदास रणदिवे,
व वामन जाधव
हे सहभागी
होणार आहेत.
दु. 3.30 वा.
निमंत्रितांचे कवि
संमेलन होणार
आहे. यावेळी माधव
पवार, अध्यक्ष
असून यामध्ये
निमंत्रित कवी
सहभागी होणार
आहेत.
सोमवार, दि. 10 मार्च
2025 सकाळी. 11.00 वा.
भारतीय संविधान:
नागरिकांचा स्वाभिमान
या विषयावर
परिसंवाद होणार
आहे. या
वेळी परिसंवादाचे
अध्यक्ष म्हणून
ॲड. प्रदिपसिंह
राजपूत, जिल्हा
शासकीय अभियोक्ता
उपस्थित राहणार
असून श्रीकांत येळेगांवकर,
अध्यक्ष, हिराचंद नेमचंद
वाचनालय, प्रा. विक्रम
कांबळे, ज्येष्ठ
विचारवंत हे
सहभागी होणार
आहेत. दु.
2.00 वा. डॉ.
अर्जून व्हटकर,
यांच्या अध्यक्षतेखाली
व डॉ. श्रुती वडगबाळकर,
यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणा-या कथाकथनामध्ये
योगीराज
वाघमारे व सुरेशकुमार लोंढे
हे सहभागी
म्हणून उपस्थित
राहणार आहेत.
दु. 3.30 वा. समारोपाचा
कार्यक्रम होणार
आहे. या
कार्यक्रमाचे अध्यक्ष्ा श्रीकांत मोरे,
अध्यक्ष, मनोरमा
साहित्य परिषद,
सोलापूर तसेच
प्रमुख अतिथी
दिलीप
पवार, जिल्हा
नियोजन अधिकारी,
सुनिल
सोनटक्के, जिल्हा
माहिती अधिकारी,
पद्याकर
कुलकर्णी, मराठी
साहित्य परिषद,
, कुंडलिक
मोरे व साहेबराव
शिंदे, कार्यवाह,
सोलापूर जिल्हा
ग्रंथालय संघ
आदी मान्यवर
उपस्थित राहणार
आहेत. या
प्रसंगी महाराष्ट्र शासन
डॉ.एस.
आर. रंगनाथन
उत्कृष्ठ ग्रंथालय
कार्यकर्ता/सेवक
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुरस्कार प्राप्त
उत्कृष्ठ सार्वजनिक
ग्रंथालये,तसेच
साहित्यिक व ग्रंथ वाचक
गौरव प्रमाणपत्र
वितरण संपन्न
होणार आहे.
सोलापूर ग्रंथोत्सव 2024 च्या
माध्यमातून सोलापूर
जिल्ह्यातील साहित्यिक,
ग्रंथप्रेमी, रसिक
वाचक, नागरिक
यांना ग्रंथ
हाताळण्याची, वाचनाची
व खरेदी करण्याची संधी उपलब्ध
झालेली आहे.
या मध्ये
शासकीय प्रकाशने
तसेच विविध
प्रकाशक, विक्रेते
यांचे दर्जेदार
ग्रंथ सवलतीच्या
दरात वाचकांना
खरेदी करण्याची
संधी रसिक वाचकांना
उपलब्ध होणार
आहे
दोनदिवसीय या ज्ञान,
व साहित्यिक उत्सवात सोलापूर
जिल्ह्यातील सर्व
रसिक नागरिकांनी सहभाग
घेऊन या
सुवर्ण संधीचा
लाभ घ्यावा
असे अवाहन
जिल्हा ग्रंथालय
अधिकारी, सुनिल हुसे
यांनी केले
आहे.
0 Comments