Hot Posts

6/recent/ticker-posts

वर्धा येथे राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन

 वर्धा येथे राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन   

         

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली 59 वे अधिवेशन 15 व 16 मार्च रोजी सत्यनारायण बजाज जिल्हा वाचनालय वर्धा येथे  होणार असल्याची माहिती राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. अधिवेशनाचे उद्घाटन खा. अमर काळे व आ. विजय वडेट्टीवार, आ. अभिजित वंजारी आ. सुधाकर अडवाले या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या अधिवेशनात ग्रंथालय अनुदान 40 टक्के वाढ, दर्जा बदल, नवीन ग्रंथालय मान्यता, इत्यादी समस्या सोडवणे व मार्गदर्शन करणेसाठी राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर ,मराठवाडा सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे नागपूर विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक रामदास साठे ,माहीती अधिकारी रवी गीते जिल्हा ग्रंथालय अधिकारी वर्धा नितिन सोनोने हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विषय पञिकेनुसार कार्यक्रम होणार आहेत यावेळी ग्रंथमिञ राम मेकले  कार्यापाध्यक्ष, ग्रंथमिञ सोपानराव पवार प्रमुखकार्यवाह भिमराव पाटील कोषाध्यक्ष, सुनिल कुबल स्थायी समिती सचिव, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ पदाधिकारी, व संचालक मंडळ अधिवेशन स्वागताध्यक्ष प्रदीपकुमार बजाज यांची उपस्थिती असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, अध्यक्ष ग्रंथमिञ विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे ,प्रमुखकार्यवाह साहेबराव शिंदे, सहसचिव अन्सर शेख, कोषाध्यक्ष प्रकाश शिंदे पुणे विभाग ग्रंथालय  संचालक विनोद गायकवाड,शैलशिल्पा जाधव यांनी  केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments