डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
नातेपुते येथे हास्य कवी कार्यक्रम
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-जनसेवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त नातेपुते येथील राजवैभव सांस्कृतिक भवन येथे सुप्रसिद्ध हास्य कवी अनंत राऊत यांच्या कवितांचा कार्यक्रम नातेपुते व परिसरातील ग्रामस्थांसाठी नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम सुप्रसिद्ध हास्य कवी अनंत राऊत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रज्जाक शेख मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र खंदारे, मनोज राऊत, श्रीकांत बावीसकर या मान्यवरांच्या शुभहस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रज्जाक शेख प्रा.डॉ.राजेंद्र खंदारे यांच्या शुभहस्ते सुप्रसिद्ध हास्य कवी अनंत राऊत सन्मान करण्यात आला. हास्य कवी मैफिलीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ' शिवबा ' या कवितेने केला.धर्म जातीत माणसाची विभागणी करून राजकारणी लोक द्वेष पसरवून राजकारण करीत असल्याचे प्रखड भाष्य ' भोंगा वाजलाय नेता गाजलाय ' या कवितेतून केले. यावेळी कवी अनंत राऊत म्हणाले की ,कवी कोणत्या पक्षाचा नसतो. तो समाजाचा असतो. समाजाच्या व्यथा वेदना तो कवितेतून मांडत असतो. छत्रपती शिवाजी महाराज वाचणे गरजेचे आहे. समजणे महत्त्वाचे आहे. महाराजांचा कोणत्या धर्माला ,जातीला विरोध नव्हता स्वराज्यासाठी महाराज लढले. देव दगडात नसून तो माणसात राहतो हे सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या आधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. एका क्रांतीसुर्याने दुसऱ्या क्रांती सूर्याला केलेले वंदन आहे हे आपण वाचले याचा अभ्यास केला तरच आपल्या लक्षात येईल. स्त्री स्त्रीच्या ठिकाणी श्रेष्ठ पुरुष पुरुषाच्या ठिकाणी श्रेष्ठ आपली भारतीय पुरुष प्रधान संस्कृती नाही. जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते, तेथे ईश्वर वास्तव्य करतो ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. ज्याला मायबाप कळले त्याला वेद कळले, ज्याला कळला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळली आई त्याला कळली रुक्माई, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशा अनेक कवितेतून सुप्रसिद्ध हास्य कवी अनंत राऊत यांनी श्रोत्यांची मने जिंकत माझ्या कवितेने प्रबोधन परिवर्तन होत असल तर माझी कविता कामाची आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हास्य कवी अनंत राऊत यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांनी केले. पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख राजेंद्र खंदारे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक हनुमंत वाघमोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते व प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय करमाळा येथील प्राध्यापक वर्ग कर्मचारी व नातेपुते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हास्य कवी कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Comments