Hot Posts

6/recent/ticker-posts

मातृशक्ती 'म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान!

 मातृशक्ती 'म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान!

      प्रो.डाॅ. सुवर्ण गुंड- चव्हाण, सोलापूर महाराष्ट्र

       suvarnagund333@gmail.com

           " यत्र नार्यस्तु पूज्यते ,रमन्ते तत्र देवता |" या पवित्र भावनेस केंद्रस्थानी ठेवून वरिष्ठ लेखक अनुवादक महर्षी डॉ.जी. एन. काळे यांनी , '  मातृशक्ती ' हे पुस्तक हिंदितुन लिहिले आहे. या पुस्तकामागे त्यांचा २५ वर्षाचा शोध अभ्यास आहे. वैदिक काळापासून मध्ययुग ते थेट वर्तमान काळात भारतात ज्या महान महिलांनी आपले नाव काळाच्या पडद्यावर सुवर्णाक्षरांनी कोरले त्यांची ही यशोगाथा आहे.  लेखकाच्या संग्रहात २००० हून अधिक पुस्तके आहेत. त्याचाच लेखन हा एक परिपाक म्हणावा लागेल . प्रस्तुत पुस्तकात ब्रम्हांडाची उत्पत्ती आदिशक्ती द्वारा कशी होते.ब्रह्मा,  विष्णू ,महेश यांचा जन्म त्यांचे कार्यक्षेत्र, सरस्वती- लक्ष्मी- दुर्गा यांची विविध रूपे, पंचकन्या, सप्तमातृका, श्रीकृष्णाच्या अष्ट नायिका, शक्तीपीठे, महान स्त्रीया,  संत स्त्रिया , महानमाता जिजाबाई, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे .

             विसाव्या शतकात काही विदेशी महिलांनी भारतालाच आपले घर मानले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय योगदान दिले. सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल ) मीराबेन ( मॅडलिन स्लेड ) एनी बेझंट (आयरिश लेडी) मदर टेरेसा (बेल्जियम) भारतरत्न इ. आधुनिक काळात माउंट एवरेस्ट सर करणाऱ्या अनेक तरुणी ,बिना इंजीनच्या नावेत सात समुद्र पार करणाऱ्या सहा तरुणी ,अंतरिक्षात उड्डाण घेणाऱ्या परी  ऑलपीड, पॅरा आॕलमपिकमध्ये पदकं  घेणाऱ्या, सहा विश्वसुंदरी, ३ ब्रह्मांड सुंदरी , विश्व फिल्म फेस्टिवलमध्ये जज (टीन ) खेळात नवे नवे कीर्तिमान बनवणाऱ्या मुली आहेत.शिक्षण व  आयटी क्षेत्रात नाव गाजवणाऱ्याही अनेक स्त्रीया आहेत. खरे पाहिले तर असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात स्त्रीशक्तीने कमाल केली नाही. 

      " या देवी सर्व भूतेषू, शक्ती रुपेन संस्थिता ,

        नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः  || "

भारतीय इतिहासातअनेक राण्या होऊन गेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, गौडवण्याची राणी दुर्गावती, बुंदेलखंडची राणी अवंती, देवीची उपाधी असणाऱ्या लोकमाता अहिल्याबाईं इ.होय.

            मातृशक्ती या पुस्तकात संत कवयित्री मीराबाई,संत मुक्ताबाई , संत जनाबाई.. इत्यादी संत स्त्रीयांच्याविषयी गौरव केला आहे.

       अमृता प्रीतम ,राजनीतीच्या क्षेत्रात विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू , भिकाजी कामा १९५० मध्ये भारतीय तिरंगा जर्मनीत फडकवला , अंतरिक्ष भरारी घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम . क्रीडा क्षेत्रात सानिया मिर्झा, साईना नेहवाल, मेरी कोम, मिताली राज- क्रिकेट आता स्मृती मंधाना, इंग्लिश चॅनल पाहणारी आरती सहा,ट्रेन चालक, ट्रक चालक, बस चालक इत्यादी धाडसी युवतीचाही समावेश या पुस्तकात केला आहे.

      अप्सरा, रंभा, उर्वशी मेनका व रुपवतीं राण्यांची चित्रणं , राणी रूपमती- मांडव गुरु व राजस्थानची अनुपम सुंदरी पद्मिनी चारित्र्यवाण राणी, मुमताज महाल इ.तसेच वैदिक काळात ज्या विदुषी विश्ववरा गार्गी, मैत्री ,शारदा ,भारती, शंकराचार्य -२ महेश्वरमध्ये शास्त्रार्थ आहेत त्यांचीही चित्रं वाचनीय झाली आहेत.

               विमान चालक मिलेकिरीमा,असीन,अवनी, चतुर्वेदी, शिवांगी अमेरिका ते भारत ( बांगलादेश )१७  तास न थांबता विमान चालवणारी जोया आणि सहा सहयोगी महिला पायलट कोणीही पुरुष सहकार्य नसताना विमान चालवले. .इंदोरची पलक मुछाल, देश-विदेशात गायन करून धन गोळा करून ३०००  मुला-मुलींच्या हृदयातल्या नलीकेतील अडथळ्यांचे ऑपरेशन करणारी युवती महत्त्वाचे कार्य करते. तसेच दरवर्षी अहिल्या उत्सवात भव्य प्रमाणात साजरा करणाऱ्या सुमित्रा महाजन!

                पूर्व विश्व साहित्यात पुरस्कार घेणाऱ्या अरुंधती राय,किरण देसाई, मीरा नायर, झुंपा लाहिडी, इंग्रजी भाषेसाठी .भोपाळची अंजुम परवी व संस्कृत मध्ये  पी एचडी धारक सरदार पूर होत.मध्यप्रदेशची शिरीन कुरेशी, श्रीलंकेमध्ये हिंदीची प्राध्यापकेने श्री रामावर लिहिलेली लोकगीत ,भजन, सिनेमातली गाणी आहेत . कानपुरच्या २०० च्या वर संकलित प्रकाशित करणाऱ्या डॉ. माही सिद्दिकी यांनी संपूर्ण रामायण उर्दूत लिहिलेले. पार्श्वगायिका लता मंगेशकर, ३५ भाषेत गाणारी दक्षिणची लता सुब्बालक्ष्मी इत्यादी.

            खरे पाहिले तर डाॅ.एन.जी.काळे यांचा हा ग्रंथ एक अनमोल खजिना आहे. कारण आतापर्यंत त्यांची १३६ पुस्तके , ३५० लेख मराठी, हिंदी ,इंग्रजीत संपूर्ण भारतातून प्रकाशित केले आहेत .कवी कालिदास, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, अहिल्यारत्न, खेळात मल्हाररत्न, डॉ .आंबेडकर, दादासाहेब फाळके ट्रॉफी प्राप्त आहेत तसेच राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, लॉन्स गव्हर्नर ,रोटरी इंटरनॅशनल द्वारा दि बेस्ट कॉलेज टीचर सन्मान प्राप्त आहेत. विदेशातूनही १३ उच्च सन्मान प्राप्त आहेत म्हणून या पुस्तकाबद्दल डॉ. काळे यांचे हार्दिक अभिनंदन! 


मातृशक्ती (हिंदी)लेखक डाॅ.एन.जी काळे

Reactions

Post a Comment

0 Comments