Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

 सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग सर्वाधिक  


-अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर.



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आहे.यावेळी   उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांत अधिकारी  सदाशिव पडदुने, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, डॉक्टर स्मिता चाकोते, हास्य सम्राट दीपक देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना सदाशिव पडदुणे म्हणाले की, 8 मार्च 1857 रोजी अमेरिकेतील महिलांनी उठाव करून कामावर सुट्टी मिळावी यासाठी मागणी केली. तर आठ मार्च 1917 रोजी रशिया येथे महिलांनी विविध हक्कासाठी आंदोलन केले,  मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्या होत्या. म्हणून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती नाटेकर यांनी दिली.

 यावेळी बोलताना अमृत नाटेकर म्हणाले की, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. महात्मा गांधी यांच्या इंग्रजा विरुद्धच्या चलेजाव या आंदोलनात महिलांचा सहभाग सर्वात जास्त होता. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.  महिला दिनाची थीम म्हणून स्वाक्षरी बोर्डावर सर्व महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमृत नाटेकर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे पत्र वाचून दाखवले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिलांना शुभ संदेश पाठवून दिला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. स्मिता चाकोते यांनी महिलांच्या आरोग्य विषय काही टिप्स दिल्या व जास्तीत जास्त निरोगी व आनंदी आयुष्य कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन केले.  मनीषा कुंभार, अमृत नाटेकर यांनीही मनोगत व्यक्त करुन   मोनिका सिंग ठाकूर यांनी  महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे गित सादर केले. तर हास्य  सम्राट दीपक देशपांडे, आबा पाटील यांनी विनोदी सादरीकरण केले.

Reactions

Post a Comment

0 Comments