अकोले (खुर्द) येथील शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी साईप्रसाद ढवळे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात पाचवा
तर प्रतिक चोपडे राज्यात दहावा
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-अकोले खुर्द ता माढा येथील बबनराव शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालय अकोले (खुर्द) येथील खालील विद्यार्थ्यानी परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव झळकवत यश संपादन केले .
महाराष्ट्र टॅलेट सर्च परीक्षा (M TS ) जळगाव यांच्यामार्फत १९ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत उज्ज्वल यश खालील विद्यार्थिनींनी संपादन केले :-
१) चि. साईप्रसाद आनंदराव ढवळे राज्यात पाचवा व सोलापूर केंद्रात १ ला क्रमांक(इयत्ता ६वी )
( २०० पैकी १७४ गुण ) २ ) चि. प्रतिक नानासाहेब चोपडे राज्यात दहावा क्रमांक व सोलापूर केंद्रात २ रा क्रमांक (इयत्ता ६ वी ) ( २०० पैकी १६४ गुण ) वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल गुणवंत सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक धनुसिंग रजपूत सर यांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . संजयमामा शिंदे , संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, प्रशालेतील जेष्ठ शिक्षक संभाजी अनपट , स . रा . मोरे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे, तसेच प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .
0 Comments