Hot Posts

6/recent/ticker-posts

वैराग येथील संतनाथ साखर कारखान्याला भीषण आग

 वैराग येथील संतनाथ साखर कारखान्याला भीषण आग


वैराग (कटूसत्य वृत्त):- वैरागमधील तुळशीदास नगर येथील भोगावती तथा संतनाथ सहकारी साखर कारखान्याला आज (दि. ६) भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मागील कित्येक वर्षांपासून कारखान्यावर प्रशासक आहे. मागील २० वर्षांपासून कारखाना बंद अवस्थेत होता. कारखाना स्थळावरील लाखो रुपये किमंतीचे भंगार, मशिनरी, पार्ट चोरीला गेले आहेत. कारखाना परिसरात काटेरी झुडपे, गवत वाढल्याने भंगार चोरण्यासाठी चोरट्यांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळेच भंगार चोरांनीच ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

थोर स्वातंत्र्य सेनानी तुळशीदासजी जाधव यांनी वैराग भागातील शेतकऱ्यांना एकजुट करून कारखान्याची उभारणी केली होती. संपूर्ण वैराग बाजारपेठेतील अर्थचक्र या कारखान्यावर अवलंबून होते.
Reactions

Post a Comment

0 Comments