विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कर्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 6, 2025

विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कर्यक्रम

 विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कर्यक्रम 

करमाळा (कटूसत्य वृत्त):-विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत परिवार तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम त्याचबरोबर  दि.५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तब्बल ८५ जणांनी सहभाग नोंदवला.  दि.६ फेब्रुवारी रोजी गणेश शिंदे यांचे 'आयुष्यावर बोलू काही' या विषयावर व्याख्यान झाले असून पदवी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम देखील झाला

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात गेले आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रांगोळी स्पर्धा, मिस मॅच डे फनी गेम्स, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, मुला मुलींसाठी शेलापागोटे, रक्तदान शिबीर आणि मिस वायसीएम अशा कार्यक्रमांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंना विकसित करण्यासाठी हा सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages