लोकमंगलचे साहित्य पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 6, 2025

लोकमंगलचे साहित्य पुरस्कार जाहीर

लोकमंगलचे साहित्य पुरस्कार जाहीर



सोलापूर (कटुसत्य वृत्त):- येथील लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते हिराचंद नेमचंद वाचनालयातील र्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
लोकमंगलच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. यंदा सोलापूरचे संग्राम गायकवाड यांच्या मन समझावन या कादंवरीला तसेच संभाजीनगर येथील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे. या आत्मपर लेखनाला तर गोल्पे विभोर, गल्पेर वागान वाणी व यांच्या वंगाली कथा संग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या मुंबईच्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आह. मराठी भाषा वाङमयातील संस्थात्मक योगदानावद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य
केल्यावद्दल कौतिकराव ढाले- पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सोलापुरातील सुनीता डागा यांच्या हजार मैलावर तुझे शहर या कविता संग्रहास पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे सांगून यंदापासून शेतकऱ्यांसाठी कृषिभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार देशमुख यांनी केली.
या पत्रकार परिषदेस शोभा वोल्ली, शिरीष देखणे, नितीन वैद्य, विजय साळुंखे, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी, प्रा.डॉ. रूचा कांवळे, अनिता ढोवळे, दीपा कोठारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages