शरद नागरी सहकारी बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- येथील शरद नागरी सहकारी बँकेला मानाचा समजला जाणारा
बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.
ॲविज पब्लिकेशन,कोल्हापूर ही संस्था देशभरातील सहकारी बँकांच्या आर्थिक परिस्थितीचा
आढावा घेऊन ज्या बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे, अशा बँकांना या पुरस्काराने गौरविते. त्यानुसार सोलापूरच्या शरद नागरी बँकेला लोणावळा येथील व्हॅली येथे झालेल्या समारंभात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक भागेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. बँकेच्यावतीने हा पुरस्कार बँकेचे मुख्य र्यकारी
अधिकारी राजेंद्र आवताडे यांनी स्वीकारला. यावेळी ॲविज पब्लिकेशन कोल्हापूरचे अविनाश
शेंद्रे, अशोक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबद्दल बँकेचे संस्थापक तथा माजी
महापौर मनोहर सपाटे, अध्यक्ष प्रा. महेश माने, सर्व संचालक व बँकेचे अधिकारी आणि सेवक
वर्गाचे कौतुक होत आहे.
0 Comments