शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 20, 2025

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करावेत

 शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 

अनुदान  योजनेचे प्रस्ताव सादर करावेत

 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अल्पसंख्याक विकास विभागाकडून "धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका , नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी  अनुदान योजना सन 2024-25" चे प्रस्ताव जिल्ह्यातील पात्र संस्थांनी सादर करावेत.


      या योजनेचा लाभ घेण्याकरिता सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र संस्थांनी सन 2024-25 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पूर्वी सादर करावेत. त्या नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे अहवान जिल्हा नियोजन अधिकारी, तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, दिलीप पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages