Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 


          सोलापूर(कटूसत्य वृत्त):- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील पात्र संस्थांनी प्रस्ताव  दि. 22 फेब्रुवारी 2025 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, दिलीप पवार यांनी केले आहे.


                 या योजनेसाठी सदर शासन परिपत्रक व शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणा-या पात्र संस्थांनी सन 2024-25 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे दि. 22 फेब्रुवारी 2025 पूर्वी सादर करावेत. त्या नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आहवानही जिल्हा नियोजन अधिकारी, तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी,  पवार यांनी केलेले आहे

                                                        

Reactions

Post a Comment

0 Comments