Hot Posts

6/recent/ticker-posts

ऐतिहासिक नाट्यप्रयोगातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न

 ऐतिहासिक नाट्यप्रयोगातून लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये 

शिवजयंती उत्साहात संपन्न


टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्यु. कॉलेज टेंभुर्णी येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करुन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी ऐतिहासिक विविध प्रसंगांवरती आधारित भाषणे, शाहिरी पोवाडे, जलसारुपी कविता, गीत गायनाच्या माध्यमातून तसेच ऐतिहासिक नाट्यप्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. जिजाऊ, शिवबा व मावळ्यांच्या वेषभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून शिव प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली.  प्रशालेचे प्राचार्य विकास करळे सर बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे जेणेकरून महाराजांचा सत्य इतिहास आपल्याला माहिती होईल. 

  संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य विकासजी करळे, पीआरओ सागर खुळे, प्री प्रायमरी इन्चार्ज सुप्रिया काळे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि परिसरातील शिवप्रेमी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया मस्के, कृतिका सरडे प्रस्ताविक वेदिका बाबर तर रिया शिंदे हिने आभार व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments