महिलांसाठी 'छावा' चित्रपट मोफत
अहिल्यानगर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षमयी जिवनावर आधारित चित्रपट छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. पहिल्या पाच दिवसांत १६५ कोटींची कमाई केली आहे. लवकरच तो २०० कोटींच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मातीशी संबंधीत असल्याने राजकीय पुढाऱ्यांनी या संधीचे सोने करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला विजय मिळाला त्या महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांनी एका छोटेखानी थिएटरमध्ये महिलांना छावा चित्रपट मोफत पाहण्याची सोय केली आहे.
अहिल्यानगरच्या सिनेलाईफ मिनीप्लेक्समध्ये हा चित्रपट महिलांना मोफत पाहता येणार आहे. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून महिलांना त्यांच्या मुलांवर शौर्याचे संस्कार करता यावेत या हेतूने हा चित्रपट मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही काही ठिकाणी अशा ऑफर सुरु करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कंपन्यांनी आपल्या कर्मचान्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना अख्खा शो बुक करून छावा चित्रपट
.png)
0 Comments