Hot Posts

6/recent/ticker-posts

तडवळे येथे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे यांचा जाहीर नागरी सत्कार

 तडवळे येथे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे 

यांचा जाहीर नागरी सत्कार


कसबे तडवळे. (कटूसत्य वृत्त):-धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी येथील ग्रामस्थ व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

         कसबे तडवळे येथील ग्रामस्थांचा बऱ्याच वर्षापासून चा प्रश्न होता की कसबे तडवळे या ठिकाणी एसएससी बोर्ड परीक्षा केंद्र असावे. अनेक वर्ष बोर्डाकडे एसएससी केंद्राची मागणी करून ही यश मिळाले नव्हते. परंतु गावातील शिक्षणप्रेमी नागरिक  यांनी नेहमी पाठपुरावा केला आणि शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे यांनी शिक्षण विभागाकडे एसएससी केंद्राची मागणी लावून धरली. शेवटी कसबे तडवळे या ठिकाणी एसएससी केंद्र मिळवून देण्यामध्ये शिक्षक आमदार  विक्रमजी काळे यांनी मोलाचा वाटा उचलल्यामुळे ग्रामपंचायत कसबे तडवळे व येथील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमाची सुरुवात  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केलेले खेळाडू आणि गुणवंत शिक्षक श्री एस. टी. पालके यांचा शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक  आर. डी. गाढवे यांनी एस. एस. सी. बोर्ड मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच शाळेची गुणवत्ता, स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल परंपरा सांगितली. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना तानाजी जमाले यांनी येथील शाळेत असणारी गुणवत्ता सांगून येथे वसतिगृह असावे अशी मागणी केली. श्री शि.शि. प्र.मंडळ बार्शी या संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे याने गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विक्रमजी काळे साहेब यांनी एस. एस. सी.बोर्ड केंद्र मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न सांगून विविध कामाची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडप्पाजी कोरे यांनी शिक्षणाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.के. ठाकरे व आभार प्रदर्शन तेजस भालेराव यांनी केले.या कार्यक्रमासाठी सरपंच स्वाती जमाले, उपसरपंच प्रताप करंजकर, संस्थेचे सहसचिव देबडवार,खजिनदार बापूसाहेब शितोळे, संस्था सदस्यडी.एम. मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी शिनगारे,हनुमंत पवार,शिक्षणप्रेमी नागरिक अरुण पाटील,तेजस भालेराव,दिलीप करंजकर,किशोर डाळे,चंद्रप्रकाश जमाले,सचिन पाटील, मुख्याध्यापक.आर.डी.गाढवे, लंगडे,बालाजी तांबे,बालाजी इतबारे,राजकुमार मेंढेकर,अंकुशराव नाडे,विशाल जमाले,सर्व ग्रा.पं. सदस्य, मुख्याध्यापक शेख, मुख्याध्यापक रहेमान सय्यद,आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे,ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments