कस्तुराई फीड्स या पशुखाद्य निर्मिती कंपनीचे
बबनराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचे कस्तुराई फीड्स या पशुखाद्य निर्मिती कंपनीचे उद्घाटन माजी आमदार बबनराव शिंदे , आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयमामा शिंदे होते .
बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील एमआयडीसी प्लॉट नं. B-2/3, MIDC येथे उद्घाटन समारंभ पार पडला .यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक गोरख खटके पाटील यांनी प्रास्ताविकात कंपनीची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी हभप सुसेन महाराज नाईकवाडी यांचे कीर्तन झाले . दुग्ध व्यवसाय तज्ञ डॉ .शैलेश मदने यांनी दुग्ध व्यवसायबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी बोलतांना माजी आमदार बबनराव शिंदे , माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील , माजी आमदार संजयमामा शिंदे , संजय कोकाटे , मधुकर देशमुख , राजेंद्र ढेकणे यांनी आपल्या भाषणातून गोरख खटके यांच्या कस्तुराई फिडस या पशुखाद्य निर्मिती कंपनीला शुभेच्छा देऊन भविष्यात कंपनीचा विस्तार संपूर्ण राज्यात व्हावा अशा शुभेच्छा दिल्या .
यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे , संजय कोकाटे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके पाटील,सापटणेचे नेते बाळासाहेब ढवळे ,दिलीपराव भोसले,औंदुबर महाडिक ,रमेश पाटील,संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सचिन जगताप ,भारतनाना पाटील,नागनाथ पाटील ,सुरेश ताटे,डॉ. शैलेश मदने , डॉ. पराग घोगळे,राजेंद्र वायसे, आण्णासाहेब पवार , दत्तात्रय ढवळे , शिवसेनेचे अध्यक्ष मधुकर देशमुख , इंदापूर नगरसेवक बाळासाहेब ढवळे,सतीश आबा सुर्वे,माणिक लांडे,नितीन कापसे , इंदापूरचे संदीप पाटील ,हभप सुसेन महाराज नाईकवाडे , , माजी सभापती पिंटू काळे , मुन्ना साठे , लोकविकास डेअरी चेअरमन दिपक देशमुख , व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय खटके पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागेश खटके , धनंजय मोरे, संतोष खटके,शिवाजी पाटील , सतिश पाटील , नानासाहेब ढवळे,प्रभाकर परबत,राजेंद्र परबत पाटील,नागनाथ ढवळे,गणेश बापू ढवळे , डॉ मनोज काळे, दादासाहेब पाटील,संदीप गायकवाड,सोमनाथ नाळे,राहुल अण्णा लांडे,विजय जगताप,संजय भांगे,अतुल सरडे, संजय दुपडे,उद्योजक धनंजय ढवळे , भाजपचे इंदापूरचे अध्यक्ष रामभाऊ आसबे ,वेणेगाव चे माजी सरपंच राजाभाऊ शिंदे , संचालक सचिन देशमुख , ऋषिकेश बुडे पाटील , सरपंच बाळासाहेब ढेकणे ,,भजनदास खटके , सुरेश लोंढे , राजेंद्र ढेकणे , डॉ राहुल पाटील , अशोक खटके , जयवंत पोळ , दादा कोल्हे , , अमोल जगदाळे,नितीन खटके,विवेक येवले , हरिदास माने , सचिन लोंढे,श्रीपती खटके, नवनाथ खटके,दिपक खोचरे,महेश देशमुख,उपस्थित होते .
सुत्रसंचलन राजाभाऊ पाटील , राजेंद्र मुळे यांनी केले तर आभार संचालक नागेश खटके पाटील यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश खटके ,रणजीत खटके , सागर खटके ,गणेश गुंड,उदय खटके,ओंकार खटके,बालाजी साळुंके यांनी परिश्रम घेतले .

0 Comments