Hot Posts

6/recent/ticker-posts

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

 संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना 

आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन      

लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा होणार 

 

 सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजना या योजनेतील उत्तर सोलापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे  उत्तर तहसिल कार्यालयात दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत जमा करावीत, असे आवाहन तहसिलदार निलेश पाटील यांनी केले आहे.


        उत्तर सोलापूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे बहुतांश लाभार्थ्यांनी  हयात प्रमाणपत्र , आधारकार्ड छायांकित प्रत , बँक पासबुक छायांकित प्रत , रेशनकार्ड छायांकित प्रत व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र कार्यालयात जमा केलेली नाहीत. तरी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थ्यांनी  स्वत:  दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत उत्तर तहसिल कार्यालयात जमा करावेत अन्य कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते स्विकारले जाणार  नाहीत . विहित वेळेत लाभार्थ्यांनी कागदपत्रे  जमा न केल्यास लाभापासुन लाभार्थी वंचित राहिल्यास सर्वस्वी जबादारी लाभार्थ्यांची राहिल  अशी माहिती तहसिलदार निलेश पाटील यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments