नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी..
शैक्षणिक/ क्रीडा / प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
मान्यवरांचा नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-बुधवार दिनांक 19/02/2025 फेब्रुवारी रोजी टेंभूर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.....
सालाबाद प्रमाणे याही वर्षी नरसिंह प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्यावतीने शिवजयंती निमित्त सामाजिक/शैक्षणिक/ क्रीडा / प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो... यावर्षी पुरस्कर्ते ऋषिकेश मोहन बोबडे यांना व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कार्याबद्दल आदर्श समाजसेवक पुरस्कार, कु. साक्षी गणेश पलंगे यांना मुंबई पोलीस दलात भरती झाल्याबद्दल स्वप्नपूर्ती हा पुरस्कार, कुंदन चांगदेव लोंढे यांना मुक्या प्राण्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल श्वानप्रेमी पुरस्कार तसेच यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तुळजाभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट हॉलीबॉल संघ हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी सई तेजस निबांळकर, वैष्णवी जाधव, भक्ती पवार यांनी शिवगर्जना दिली तसेच पृथ्वीराज शिंदे, अथर्व शिंदे, कार्तिकी शिंदे, दुर्वा लोंढे, आयुष गायकवाड, विराज पवार, सई लोंढे, सात्विक जाधव, ऋतुजा पवार, श्रेया पवार, जान्हवी पवार, अमोल महाडिक, अथर्व पवार, शोर्य हवालदार, यश पवार, अश्रफ काझी, यांनी भाषणातून शिवरायांचा इतिहास, शौर्य,पराक्रम, याबाबत आपले विचार व्यक्त केल्याने सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात आले यावेळी सौ.सुरजा बोबडे सरपंच टेम्भूर्णी ग्रामपंचायत, प्रमोद कुठे, माजी सरपंच टेंभुर्णी, डी. बी गायकवाड सर,संजय कोठारी, योगेश बोबडे, सतीश नेवसे, राहुल टिपाले, जयंत कांबळे, गोविंद पोळ, पेपश पाटील, दादा कोल्हे, महादेव कोल्हे, सोमनाथ महाडिक, सचिन होदाडे ग्रा पं सदस्य टेम्भूर्णी, गणेश कांबळे,व नरसिंह प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वजाळे सर यांनी केले... अतिशय अतिशय उत्साहात व फटाकांच्या आतिषबाजीत शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली ..

0 Comments