Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज बस डेपो साठी नवीन एसटी बसची मागणी, शिवसेनेच्या वतीने गोगावले यांना निवेदन

 अकलूज बस डेपो साठी नवीन एसटी बसची मागणी, 

शिवसेनेच्या वतीने गोगावले यांना निवेदन

नातेपुते (कटूसत्य वृत्त):-अकलूज बस डेपोसाठी नवीन २० एसटी बस मिळणेसाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन व खारभूमी मंत्री भरत गोगावले हे नातेपुते येथील शिवसेना भवन या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता शिवसेनेचे माळशिरस तालुका नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी अकलूज बस डेपो साठी एसटी बस  मागणीचे निवेदन मंत्री भरत गोगावले यांना दिले.अकलूज बस डेपोच्या जुन्या झालेल्या जवळपास ४० एसटी बसेस आहेत. पूवी त्या १००च्या वर होत्या, बसची संख्या कमी झाल्याने विद्याथ्यांना खेड्या गावावरून येण्यास अडचण निर्माण होत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पर्यटन दर्शन वारी योजना अखंड चालू ठेवण्यासाठी बस उपलब्ध असणे अत्यत  गरजेचे आहे.,रोजगारासाठी, रुग्णांना उपचार घेण्यासाठी तसेच शिक्षणासाठी बारामतीमध्ये जाणारे हजारो विद्यारथी, विद्यार्थिनी महिला पुरुष एसटी बसचा वापर करतात. अपुरे असलेल्या बसच्या संख्येमळे शिक्षण घेणे अवघड झालेले आहे. अकलूजच्या जवळ पंढरपूर तीथक्षेत्र, अकलकोट गोंदावले, शिर्डी, नाशिक त्रिंबकेश्वर आदी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकाना बस उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी जाणे शक्य होत नाही. तरी आपण निवेदनाचा सकारात्मक विचार करून अकलूज डेपोसाठी  नवीन २० एसटी बसेस " उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून सदर निवेदन नातेपुते येथील शिवसेना भवन या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांना शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील तसेच सनी भरडकर विनोद बोराटे भोजराज हिवरकर भाजपाचे मनोज जाधव बबन रुपनवर शंकर शिंगाडे रियाज शेख दत्ता गोरे तसेच शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments