आकाश ढवळे व प्रियंका पाटील यांचा
माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान संपन्न
टेंभूर्णी(कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व जु. कॉलेज टेंभुर्णी येथे 'अधिकारी आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचेही अधिकारी होण्याचे स्वप्न अधिकाधिक सोपस्कर व्हावे या हेतूने संस्थेने हा नवीन कृतीशील उपक्रम आयोजित केला आहे. हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रतिमा पूजनाने सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेत या दोन्ही गुणवंतांनी यश मिळविले. यातूनच अन्नसुरक्षा अधिकारी वर्ग दोन या पदासाठी प्रियंका प्रताप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये आकाश मदन ढवळे यांची नियुक् झाली. त्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आकाश ढवळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपण अभ्यास किती वेळ करतो यापेक्षा कसा करतो याकडे जास्त लक्ष द्यावे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे यश तुमच्या जवळ येईल. मोबाईल पासून दूर रहा. वर्तमानपत्र दररोज वाचत चला अशा अनेक लहान मोठ्या सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरजा बोबडे, प्रशालेचे प्राचार्य विकास करळे, आकाश ढवळे, प्रियंका पाटील, अमृत पाटील, संजय काका पाटील, अमित पाटील, बालाजी ढवळे, अरुण ढवळे व इतर अनेक मान्यवर, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments