शिंदे विद्यालयातील विद्यार्थी चौधरी याचे अपघाती निधन
टेंभुर्णी(कटूसत्यवृत्त):-माढा तालुक्यातील मौजे अकोले-खुर्द येथील बबनरावजी शिंदे विद्यालयातील इ.पाचवीत शिक्षण घेणारा निरागस विद्यार्थी शेखर सारंग चौधरी (वय-११ वर्ष) याचे सोमवारी अपघाती निधन झाले.
तो ५.४० वा.सुमारास वडिलांबरोबर मोटारसायकलवर बसून टेंभुर्णीकडे येत होते.आयशर ट्रकने (क्र-एच.आर-६६ सी -४९९२) त्यांच्या मोटारसायकलला (क्र-एम.एच-१२ एफ.आर-५५८३) धडक दिल्याने झालेल्या अपघातात निधन झाले.यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शेखर चौधरी हा त्याचे शिक्षक वडील सारंग चौधरी यांच्या बरोबर दुचाकीवरून करमाळा-टेंभुर्णी रोडवरून टेंभुर्णीकडे येत होते.ते टेंभुर्णी रोडवरील करमाळा ब्रिज पासून एक कि.मी.अंतरावरील एका पेट्रोल पंपाजवळ आले असता पाठीमागून आलेल्या एका आयशर ट्रकने त्यांच्या मोटारसायकल पाठीमागून जोरदार धडक दिली.यात मोटारसायकल खाली पडल्याने पाठीमागे बसलेला मुलगा शेखर हा रोडवर पडला तर वडील सारंग हे रोडच्या बाजूला पडल्याने ते बचावले.शेखर यास डोक्यास व छातीस जबर मार लागल्याने त्यास उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.
अपघातानंतर तो आयशर ट्रक चालक तसाच सुसाट निघून गेला.त्यास लोकांनी आडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याने जुमानले नाही.त्या दरम्यान त्याने जाताजाता आणखी दोन-तीन ठिकाणी दुचाकीस ठोकरण्याचा प्रयत्न केला.मात्र किरकोळ घटना वगळता मोठा अनर्थ टळला.त्यास दहा किमी अंतरावरील वेनेगावच्या पुढे वाहन अडवे लावून पकण्यात यश आले.पोलिसांनी मालट्रक व चालक अखिलेशकुमार छनूलालकुमार रा.गोपापुरा पोष्ट गढीरामधाम ता.जसवंतनगर,एटावा उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले आहे.या घटनेची संदिप गोरख चौधरी (वय-४२) रा.निमगाव (टें) माढा यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोहेकॉ ज्ञानदेव सरडे करीत आहेत.
शेखर हा शांत संयमी व हुशार विद्यार्थी म्हणून वर्गात ओळखला जात होता.तो पाचवी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिपसाठी पात्र ठरला होता.त्याचे भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न होते.त्याची मोठी बहीण ही सुद्धा याच शाळेत नववीत शिक्षण घेत आहे.ती दुपारीच पेपेर संपल्याने स्कुल बसने घरी गेली होती.
या घटनेची मिळताच माहिती विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र ठोंबरे,अंबाड येथील विठ्ठलरावजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य जवानसिंग रजपूत,संभाजी अनपट,विष्णू घाडगे,राजाभाऊ चौधरी यांच्यासह शिक्षक,नातेवाईक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.त्या विद्यार्थ्यांचे वडील सारंग चौधरी हे शिक्षक त्याच विद्यालयात शिक्षक आहेत.

0 Comments