नातेपुते येथे श्री संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-नातेपुते येथे श्री संत नरहरी सोनार यांची ७३९ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच नातेपुते येथील संगीत विशारद गुरुवर्य एन. बी. दीक्षित, संगीत विशारद गुळीग यांची महाराजाच्या चरणी अभंग सेवा झाली. त्याच बरोबर दत्तप्रसादीक सांप्रदायिक भजनी मंडळ नातेपुते यांचे सुमधुर भजन आणि फुलांचे अभंगा सोबत श्रीसंत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी गणेश मैड . मंगेश दीक्षित,संदीप सुभाष दीक्षित, सागर कुलथे, ज्ञानेश्वर बागडे, लोमेश औदुंबर पोतदार, प्रताप घोडके, अतुल सोनार, निलेश औदुंबर पोतदार, राहुल दीक्षित, गोविंद महामुनी, स्वप्नील पंडित, सचिन पंडित,सुहास महामुनी, अनिकेत कस्तुरे, अजय पोतदार, राजकुमार पोतदार, मिलिंद वेदपाठक, मनोज वेदपाठक, मयूर बागडे, वैभव डहाळे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. वैशाली दीक्षित यांनी सूत्रसंचालन व आभार मानले कार्यक्रमासाठी नातेपुते येथील अखंड सोनार समाज उपस्थित होता .

0 Comments