जय शिवाजी जय भारत पदयात्रेत
जय भवानी जय शिवाजी घोषणा व ढोल ताशाच्या गजराने
सोलापूर नगरी दुमदुमली!
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना पर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पालक, पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला.या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. तसेच स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले. ही यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता चौक मार्गे, रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली. या ठिकाणी सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवाकडून पदयात्रेचे स्वागत पुष्पगुच्छ व पुष्पवृष्टी करून करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नियोजन भवन येथील कार्यक्रम:-
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नियोजन भवन येथील कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
.jpeg)
0 Comments