Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप

 नेताजी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत दहावीच्या १९६ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले,  राजराजेश्वरी प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे,  पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.प्रथम वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकेतून ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र मुलगे यांनी विद्यार्थ्यांचे दहा वर्षांतील प्रगती व विविध उपक्रमातील सहभागामुळे शाळेचे नाव लौकीक झाल्याचे सांगितले. यावेळी गंगोत्री  चिप्पा, लक्ष्मी विटकर, क्षितिजा जमादार, स्वराली रॅका, प्रतीक्षा कोळी, शितल बाबा, राकेश गुत्तीकोंड, श्रीशैल निंबर्गी, यशोदा पुजारी, पूर्वा रेके या विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले , शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर भविष्यात वाटचाल करावी. नेताजी शाळा आपल्या हक्काची शाळा असल्याने वेळोवेळी येण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले म्हणाले, विद्यार्थ्यांनी शाळेचे व आई-वडिलांचे नाव लौकिक करावी.भविष्यात ही अशीच शाळेविषयी प्रेम आपुलकी व जिव्हाळा राहो असे शुभचिंतले व येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ माळगोंडे, राजकुमार मरगुरे, बसवराज तेग्गेळी, विजयालक्ष्मी माळवदकर वर्गशिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आदिती घुगरे  यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments