लऊळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी
लऊळ (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कु.दुर्वा लोकरे आणि ज्ञानेश्वरी नलवडे या शाळकरी मुलींनी आपल्या भाषणातून आपले विचार व्यक्त करत महाराजांच्या इतिहासाची गाथा मांडली. शिवप्रेमी जयंती उत्सव मंडळ, राजमुद्रा जयंती उत्सव मंडळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने रयतेच्या राजास अभिवादन करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयासह विविध प्रशासकीय कार्यालय, शाळा, विद्यालय याठिकाणी देखील मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments