राहुल सोलापूरकरचा माफीतही कावा; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2025

राहुल सोलापूरकरचा माफीतही कावा; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

 राहुल सोलापूरकरचा माफीतही कावा; 

मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप       

                                     

 पुणे (कटूसत्य वृत्त):- हरामखोर राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.माफिवीराचा वंशज राहुल सोलापूरकरच्या विरोधात आंदोलने होत आहेत. टीकेची झोड उठली आहे. आता अभिनेते किरण माने यांनीही राहुल सोलापूरकरला चांगलंच सुनावलं आहे. या वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरनी जाहीर माफी मागितली. याच माफीच्या व्हिडिओवर किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल सोलापूरकरने माफी मागतानाही महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचे माने यांनी म्हटले आहे.किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. यात ते लिहीतात की, माझ्या बहुजन शिवभक्तांनो, शिवजयंतीला तुम्ही कुणाचे व्याख्यान आयोजित करत आहात त्याचा मेंदू आणि विचार पुर्ण तपासुन बोलवा. गेली अनेक दशकं छ. शिवरायांचा जयजयकार करत, त्यांच्याविषयी खोट्या गोष्टी पेरणाऱ्या एका पुणेरी बाजारबुणग्या शिवशाहीराची पिलावळ मनुवाद्यांचा छुपा अजेंडा राबवत आहे. प्रोपोगंडा सिनेमाप्रमाणेच व्याख्यानांमधूनही हे विष पेरलं जातंय ! काल तो राहुल सोलापूरकर माफी मागताना जे बोलला ते नीट ऐका म्हणजे या मनुवादी बांडगुळांचं कपट कळेल. माफी मागतानाही या भिकारड्याने 'छ. शिवराय हे 'सामदामदंडभेद' या चार पद्धतीने मोठे राज्यकर्ते होऊन गेले. ' हा निव्वळ खोटा आणि शिवकार्य हीन लेखण्याचा कावा खेळलाय. छ. शिवराय मोठे ठरले ते गोरगरीब, कष्टकरी रयतेची घेतलेली काळजी आणि योजनाबद्ध युद्धनितीमुळे !

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages