नई जिंदगीत शंभर दिवस टी.बी. मुक्त अभियान संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2025

नई जिंदगीत शंभर दिवस टी.बी. मुक्त अभियान संपन्न

 नई जिंदगीत शंभर दिवस टी.बी. मुक्त अभियान संपन्न 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नई जिंदगी नागरिक आरोग्य केंद्रामार्फत शंभर दिवस टी. बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत दिनांक 01/02/2025 रोजी बापूजी नगर येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी सोलापूर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर, मेडिकल ऑफिसर नई जिंदगी ना. आ.केंद्राचे डॉ.गीता गावडे, न्यू लाईफ क्लिनिकचे डॉ.सोहेल मुजावर, व आरोग्य सेविका लिना पवार यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी व एक्स-रे काढून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. 

यावेळी सोलापूर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर यांनी '१०० दिवस टीबी' शिबीराबाबत माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. आलेल्या सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी व एक्स-रे करण्यात आले. यामध्ये एकूण 93 नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी नागरिक आरोग्य केंद्र नई जिंदगी येथील सिस्टर्स, NTEP स्टाफ, लॅब टेक्निशन,संबधित सर्व आशा वर्कर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages