" त्या शेवटच्या तीन दिवसात मतदार याद्यात मोठा घोळ", सुप्रिया सुळे यांच्या सर्वात मोठ्या आरोपाने खळबळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2025

" त्या शेवटच्या तीन दिवसात मतदार याद्यात मोठा घोळ", सुप्रिया सुळे यांच्या सर्वात मोठ्या आरोपाने खळबळ

 " त्या शेवटच्या तीन दिवसात मतदार याद्यात मोठा घोळ", 

सुप्रिया सुळे यांच्या सर्वात मोठ्या आरोपाने खळबळ  

                                                                                                                                                    

 पुणे(कटूसत्यवृत्त):- “धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात . बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. पण मशीन बंद करा. राज ठाकरेंनीही त्यांच्या उमेदवाराला त्याचंही मत मिळालं नसल्याचं सांगितलं. आम्ही आणि शिवसेना तिथे लढलो. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. या सरकारमधील एक मंत्री आहेत. त्याने सांगितलं की, साताऱ्यातील सीट एनसीपी पराभूत झाली कारण ट्रम्पेट आणि तुतारीमुळे झाले. आम्ही तुतारी हटवण्याची मागणी केली. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं. तरीही त्यांनी चिन्ह बदललं नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. ११ जागा आमच्या अशा गेल्या”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"आम्ही मतदार यादी मागत आहोत" “मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्हीमतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत", असा सवाल

सुप्रिया सुळेंनी विचारला. “शेवटच्या तीन दिवसात ही नाव वाढली” “ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages