Hot Posts

6/recent/ticker-posts

हरवलेल्या मुलाच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

हरवलेल्या मुलाच्या पालकांनी संपर्क साधण्याचे

 आवाहन





             सोलापूर    (कटूसत्य वृत्त):-      श्री विठ्ठल मंदिर परिसर, पंढरपूर जि सोलापूर येथून अथर्व निलेशराव देशमुख वय अंदाजे ८ वर्ष विनापालक आढळले आहे. सदर बालकाच्या आई वडिलांनी अथवा त्याच्या इतर नातेवाईकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी किंवा बाल कल्याण समिती, सोलापूर, अथवा जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, (रिमांड होम) सोलापूर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

             सदर बालकास काळजी व संरक्षणासाठी बाल कल्याण समिती, सोलापूर यांच्या आदेशाने जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, (रिमांड होम) सोलापूर येथे दाखल केले असून, बालकाच्या आई वडिलांनी अथवा त्याच्या इतर नातेवाईकांनी ही माहिती प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (श्रीमती गायकवाड रेश्मा संपर्क क्रमांक ९४२०४४७३२९) किंवा बाल कल्याण समिती, सोलापूर, अथवा जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, (रिमांड होम) सोलापूर यांचेशी संपर्क साधावा असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर कळविले आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments