श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे जिवन चरित्र यांचे वाचन झाले . जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन छत्रपती ज्या मातेने घडविले त्या मातेचे आपण सर्वांनी स्मरण करू या विचार आत्मसात करूयात त्यांचे चरित्राचे पारायण होणे आजच्याकाळाची गरज आहे . जगात हा जन्मोत्सव सोहळा साजरा होते आहे असे मत विनोद भोसले यांनी मांडले. तसेच या प्रसंगी सोलापुर महानगर पालीकेचे सहाय्यक अभियंता मुन्ना तळेकर यांची पदोन्नती बद्दल सत्कार श्री शिवजनोत्सव महामंडळाचे वतीने ट्रष्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे , व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांचे हस्ते सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उत्सवा अध्यक्ष सुभाष पवार, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर (नानासाहेब) काळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास ज्ञानेश्वर सपाटे, शेळके, शिवराम प्रतिष्ठाणचे जितु वाडेकर, बजरंग जाधव, अंबादास सपकाळे, विजय पुकाळे, विजय भुईटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विदयापिठाचे सिनेट सदस्य गणेश डोंगरे , प्रा. संजय जाधव, प्रा .जीवन यादव , सचिन स्वामी, संदीप साळुंखे , कार्यालय प्रमुख देविदास घुले, राजू व्यवहारे बसवराज कोळी सखारम साठे मारुती सावंत ललीत धावणे, बोरजंगे आण्णा , ईत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती मधे हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिवन यादव यांनी केले तर आभार सखाराम साठे यांनी मानले .
0 Comments