चोरट्यांची नवीन शक्कल.. चक्क पांढऱ्या कारमध्ये दुधारू गाय वासरू पळवून नेले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 11, 2025

चोरट्यांची नवीन शक्कल.. चक्क पांढऱ्या कारमध्ये दुधारू गाय वासरू पळवून नेले

 चोरट्यांची नवीन शक्कल.. चक्क पांढऱ्या कारमध्ये दुधारू गाय वासरू

 पळवून नेले .शहर पोलिसांनी लावला दोन दिवसात छडा     

    दोन आरोपींसह गाय व कार जप्त

 मूर्तिजापूर (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील गोवंश चोरून निर्दयीपणे कत्तलीसाठी  नेतांना व गोमांस विक्री करणाऱ्यांवर मुर्तीजापुर पोलिसांची कारवाई अलीकडच्या काही दिवसापूर्वीच झाली.तरी गोवंश चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाच नाही त्यात पुन्हा शहरातील गोयंका नगर परिसरातून चक्क पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये  ७ जानेवारीच्या रात्री ३.२० वाजण्याच्या दरम्यान एका इसमाच्या गोठ्यातील एक दुधाळ गाय व एक गोऱ्हा अज्ञात इसमांनी चोरून नेला. या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी या घटनेचा दोन दिवसात छडा लावून दोन्ही  आरोपींना दुधाळ गाय, गोऱ्हा व मुद्देमालासह सापळा रचून ९ जानेवारीला अटक केली.

शहरातील गोयंका नगर रहिवासी शेतकरी सुभाष सुदाम बाजड (कवठा सोपीनाथ) वय ६०  हे ग्रामीण भागातील असल्याने दही दुभत्यासाठी घरी गाय पालन करतात . या गुन्ह्यातील आरोपी (शेख अलफैन उर्फ सोहेब शेख इरफान वय २३ रा. फिरदोस कॉलनी अकोला,) (मोसीन शहा अब्दुल शहा वय ३२ रा. इक्बाल कॉलनी अकोला )या दोघांनी ७ जानेवारीच्या रात्री ३:२० दरम्यान  गोठ्यातून दुधाळ गाय किंमत ६० हजार रू.गोऱ्हा किंमत ७० हजार रू. असा एकूण १ लाख ३० हजार रूपायांचा मुद्देमाल अज्ञात ३ ते ४ इसमांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये नेला   सदरचा गुन्हा दाखल करून तपासात केला .पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, अंमलदार मुन्ना पांडे, सचिन दांदळे, नंदकिशोर टिकार, पो.कॉ. सचिन दुबे, मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर, नामदेव आडे यांनी सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपीतांना पो. स्टे. चे गुन्हे शोध पथकाचे मदतीने दोन दिवसात अटक करून कार्यवाही केली . आरोपीजवळून गाय व गाडी क्रं. एमएच ३० सी.जे. ६२१२ किंमत ४ लाख रू व २ मोबाइल फोन किंमत ५० हजार रू. असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.व इतर आरोपींचा शोध शहर पोलीस करीत आहे. अधिक तपास पोउपनि आशिष शिंदे करीत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages