Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक युवा दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक युवा दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे

 आयोजन




     

 सोलापूर    (कटूसत्य वृत्त):-     जागतिक युवा दिन निमित्त दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी संत सावता माळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्डूवाडी या संस्थेत उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या अथवा सन्मानिय पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
            संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी यशस्वी उद्योजकांचे स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मार्गदर्शन व निबंध स्पर्धा इत्यादी आयोजित करण्यात आले असून, आय.टी.आय. कुर्डूवाडी येथे प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या उद्योजकांनी व सन्मानिय पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या संस्थेतील गटनिदेशक श्री.खान एफ.एम.( मो.नं. 8805695282) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

                                               

Reactions

Post a Comment

0 Comments