रोटरी 100 डिजिटल क्लासरूम प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत रोटरी क्लब ऑफ सोलापूर व पी.पी. पटेल मेटल पावडर डिव्हिजन यांच्या संयुक्त अर्थसहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘रोटरी 100 डिजिटल क्लासरूम प्रकल्प’ चे लोकार्पण शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी गुजरात भवन, सोलापूर येथे दिमाखात पार पडले.
या प्रकल्पांतर्गत, रोटरी जिल्हा 3132 च्या 11 जिल्ह्यांतील 100 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारण्यात येणार आहेत. प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, माजी प्रांतपाल स्वाती हेरकल, नियोजित प्रांतपाल सुधीर लातूरे यांच्या शुभहस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
सोलापूर रोटरी परिवाराचा सहभाग आणि मान्यवरांचे विचारमंथन सोलापूर रोटरी परिवारातील सर्व क्लब अध्यक्ष आणि सचिव तसेच अक्कलकोट, तुळजापूर, मंगळवेढा, पंढरपूर येथून मोठ्या संख्येने रोटेरियन उपस्थित होते. TRF संचालक क्षितिज झावरे, पब्लिक इमेज संचालक रवींद्र बनकर यांचीही आवर्जून उपस्थिती होती. माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान, झुबिन अमेरिया, आणि रोटरी टीम 2026-27 चे प्रांतपाल जयेश पटेल सोबत असलेले सर्व रोटेरियनही कार्यक्रमात सहभागी झाले.
या सोहळ्यात सर्व मान्यवरांनी आपली मते व्यक्त करत प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रांतपाल जयेश पटेल यांनी ‘जयेश-पारूल एंडोमेंट फंड’ ची घोषणा करून रोटरी फाउंडेशनच्या निधी वाढीसाठी योगदान दिले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर चे अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले आणि प्रकल्प ची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय झवेरी यांनी कुशलतेने केले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी सचिव ब्रिजकुमार गोयदानी यांनी पार पाडली. डॉ. केदार कहते, राजनभाई वोरा, अतुल चव्हाण, संजीव मेंठे सुहास लाहोटी सलाम शेख यांच्यासह रोटरी टीम 2026-27 मधील सर्व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांत्रिक माहिती व भविष्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची दिशा पुण्याचे बिरेन धर्मसी यांनी डिजिटल सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली, तर कौशिक शहा यांनी एलईडी व इतर उपकरणांविषयी मार्गदर्शन केले. या प्रकल्पामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाचा दर्जा उंचावेल व समाजप्रबोधनाला चालना मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
‘रोटरी 100 डिजिटल क्लासरूम प्रकल्प’ हा 21व्या शतकातील शिक्षण प्रणालीला गती देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
0 Comments