सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अँन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक 23,24 व 25 मे रोजी घेण्यात येणार आहे.
परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.
परिक्षार्थीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सविस्तर अधिसुचना विभागाच्या https://sahakarayukta.
अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवरुन संपर्क साधावा (दु. क्र. 0217-2629749) असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था किरण गायकवाड यांनी केले आहे.
0 Comments