पाटील, तुमच्यामुळेच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले..." - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 17, 2025

पाटील, तुमच्यामुळेच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले..."

 पाटील, तुमच्यामुळेच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले..." 



माढा तालुक्यातील मराठा बांधवांच्या भावना



माढा (कटूसत्य वृत्त):- "पाटील, तुम्ही सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळेच संपूर्ण राज्यात जनजागृती झाली असून गावोगावी कुणबी नोंदी सापडत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रही मिळू लागले आहे ही सर्व आपलीचं देण आहे," अशा शब्दात  माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी भावना मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी  ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी प्रवर्गही असून राज्यातील अनेक भागात असलेल्या कुणबी नोंदी शोधून तेथील कुणबी समाजालाही ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले.  
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या. माढा तालुक्यातील ११७ गावांमध्ये तब्बल १९४३३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ८३९६ लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपही करण्यात आले आहे तर अनेक प्रस्ताव हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतीत उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे यांचे सहकार्य लाभल्याचे मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने यावेळी मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कुणबी दाखले मिळाल्याने अनेक बांधवांना शैक्षणिक प्रवेश, नोकरीत फायदा झाल्यामुळे मराठा बांधवांनी आपले आभार मानल्याने मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने सांगितले. 

 माढा तालुक्यातील अनेक बांधवांना आपण स्वतः कुणबी असल्याची कल्पनाही नव्हती, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासकीय नोंदी तपासली असता अनेक लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.या सर्व नोंदी सापडण्यामागे मनोज जरांगे-पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्या वतीने मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, कार्याध्यक्ष रामभाऊ मिटकल यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचे आभार मानले तसेच त्यांच्या आंदोलनाला पहिल्यापासूनच सक्रिय पाठिंबा असून यापुढेही त्यांना साथ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages