किल्ले पुरंदर येथे उत्साहात पार पडला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज (दि.१६ जानेवारी) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सांगोलाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते राज्याभिषेक करण्यात आला. या सोहळ्यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे, माढाचे आमदार अभिजीत पाटील व वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी दत्तात्रय भोसले यांना कृषी, शिरीष देशमुख यांना उद्योजकता, सोशल हंड्रेड फाउंडेशन यांना सामाजिक व शिवछत्रपती कला क्रीडा मंडळ काडलास (ता.सांगोला) यांना क्रीडा क्षेत्रातील शंभुगौरव पुरस्काराने, तर ऍड. सचिन वाघ व ढवळस (ता.माढा) येथील आदर्श मुख्याध्यापक शिवाजी काळे यांना शंभुगौरव विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीरा मल्टीस्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने मर्दानी खेळ व साहसी प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी शेकडो शिवशंभुप्रेमींनी पुरंदर किल्ल्यावर उपस्थिती लावली.
0 Comments