बीडच्या उसतोड मुकादमास लुटणा-या चोरटयाना नातेपुते पोलीसानी २४ तासाच्याआत ठोकल्या बेडया, ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
दत्तात्रय मल्हारी सुळ वय ५३ वर्ष रा खोपटी ता शिरूर कासार जि. बीड हे सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास मौजे खोपटी ता. शिरूर कासार जि. बीड येथून नातेपुते मार्गे रेठरे कारखाना सातारा येथे उसतोड कामगाराना पैसे देणे करीता निघाले होते. रात्री १०: १५ वाजण्याच्या दरम्यान नातेपुते शिंगणापूर रोडने कॅनॉलचे पुढे आलो असता मला लघवी लागल्याने रोडचे बाजूला स्कुटी उभी करून लघवी करण्याकरीता थांबलो असता पाठीमागून दोन अनोळखी इसम त्याचे स्पेल्डंर मोटार सायकलवरती माझे जवळ येवून गाडी थांबवून त्यावरील एक इसम खाली उतरून त्याने माझे पाठीमागून येवून मला मिठी मारून दाबून धरले व दूस-या इसमाने मला दोन चापटी मारून माझ्याकडील पैसे व सोने काही असेल ते दे असे म्हणून माझे पॅटीच्या दोन्ही खिश्यामध्ये असलेले ३५ हजार रूपये खिश्यात हात घालून जबरदस्तीने काढून घेतले व माझी स्कुटीची चावी घेवून निघून गेले. त्याबाबत दत्तात्रय मल्हारी सुळ वय ५३ वर्ष रा खोपटी ता शिरूर कासार जि. बीड यांनी वरील घडलेल्या घटनेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असता घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक राकेश लोहार यांच्याकडे देण्यात आला होता सदरचा गुन्हा हा बाहेरील जिल्हयातील उसतोड मुकादमास रात्री अपरात्री लुटल्याने उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान नातेपुते पोलीसांसमोर होते. मात्र सोलापूर ग्रामीण पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अध्यक्ष प्रीतम यावलकर अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी घडलेला गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तयार केली व पोलीस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच गोपनीय बातमीदार व मोबाईल लोकेशन याचा अभ्यास करून २४ तासाच्या आत सदर गुन्हयातील आरोपी अकाश उर्फ अक्षय पांडुरंग मदने २६ वर्षे व सुर्यतेज उर्फ रणवीर सुरेश लांडगे दोघे रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापुर यांना नातेपुते बायपास येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिल्याने त्यांचेकडुन सदर गुन्हयात जबरीने चोरून घेतलेले ३५०००/- रकमेपैकी, ३३,४०० /- रक्कम आरोपी यांचेकडुन जप्त करण्यात आली तसेच फिर्यादीचे मोटार सायकलची चावी व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल क्रमांक एमएच ४५ एटी २८०९ किंमत रूपये ६०,०००/- असा एकुण ९३,४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून माळशिरस न्यायालयात हजर केले असता
सदर आरोपींना माळशिरस न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजुर केली. वरील गुन्हा उघड केस आणणे कामे नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद्र परजने, पो.हेड कॉन्स्टेबल नवनाथ माने, पो.ना. अमोल वाघमोडे, राकेश लोहार, पो.कॉ. नितीन पनासे, पो.कॉ. रमेश बोराटे , पो.कॉ. राहुल वाघमोडे व सायबर शाखेचे पो.हे.कॉ. युसुफ पठाण यांनी ही कामगिरी केली. नातेपुते पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल नातेपुते शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments