Hot Posts

6/recent/ticker-posts

बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

 बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना उमेदने बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन खा.प्रणिती शिंदे यांनी केले.गुरुवारी,वोरोनोको प्रशालेच्या मैदानात ग्रामविकास विभाग,जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य होते.७५ स्टॉल प्रदर्शनात विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण वस्तूंचे ७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेल घाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज,तृणधान्य चिवडा आदी उत्पादनांचा समावेश आहे.कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उत्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, सोमनाथ लामगुंडे उपस्थित खासदार शिंदे म्हणाल्या, बचत गटाच्या महिला विविध वस्तू चांगल्या तयार करत आहेत.त्याला प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामीण विकास यंत्रणा करत आहे.चूल व मूल या संकल्पनेतून महिलांना बाहेर काढण्यासाठी उमेद अभियानाचा मोठा सहभाग आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली तर त्यांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम उमेदने करावे यासाठी आपणही सर्वतोपरी मदत करू, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जंगम म्हणाले, उमेदच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्यासाठी व त्यांचे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना वैयक्तिक कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्याचा लाभ बचत गटातील महिन्यांनी घ्यावा. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी केले.प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले. महोत्सव  यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहूल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल म्हांता हे परिश्रम घेत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments