महेश कोठे हे व्हिजन असलेले नेते होते : खा.सुप्रिया
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महेश कोठे हे व्हिजन असलेले नेते होते. त्यांच्या अचानक जाण्यानेसोलापूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. गेल्या अनेक दशकापासून कोठे यांचे पवार व सुळे कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध होते. कमी वयात आपल्यातून त्यांचे निघून जाणे हे धक्कादायक असल्याची भावना खा.सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.माजी महापौर महेश कोठे यांचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मंगळवारी हृदयविकाराने ध झाले. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व खा. सुप्रिया सुळे यांनी कोठे यांच्या मुरारजी पेठेतील 'राधाश्री' निवासस्थानी भेट दिली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी श्रध्दांजली वाहिली.महेश कोठे यांच्या विषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत खासदार सुळे म्हणाल्या,संघटनेमध्ये आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. महेश कोठे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते आपल्यातून निघून गेले. हे त्यांचे कुटुंबीय व पक्षाच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आहे. त्यांनी सोलापूरसाठी पाहिलेले आय.टी. पार्कचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू तसेच प्रथमेश कोठे यांचे पालकत्वही घेऊ, असेही त्या म्हणाल्या. यावेळी राजू खरे,अभिजित पाटील, देवेंद्र कोठे हे आमदार, प्रथमेश कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी महापौर यू. एन. बेरिया, जनार्दन कारमपुरी, सुधीर खरटमल, भारत जाधव, बळीराम साठे, दिनेश शिंदे, शंकर पाटील, प्रशांत बाबर,सुनीता रोटे, रेखा सपाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments