Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय

 खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय


बीड (कटूसत्य वृत्त):- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकास जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. हत्येच्या दिवशी मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना कराड याने दिलेली धमकी, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची मागितलेली खंडणी आदी तपासातील बाजू राज्य गुन्हे अन्वेषण, विशेष तपास पथकाकडून न्यायालयात मांडण्यात आल्या.

खंडणीच्या आड संतोष देशमुख येत असल्यामुळेच त्यांना संपवण्यात आले का, असा संशय असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. कराडशी आरोपींचे केवळ फोनवरून संभाषण झाले. यावरून खुनाशी संबंध जोडून आणि मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (पान ८ वर) (पान १ वरून) का, अशी विचारणा बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा पाटील यांनी तपास अधिकाऱ्यांना केला. त्यावर तांत्रिक पुरावे, फोनवरून झालेले संभाषण, ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या वेळी आरोपी विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांचे कराड याच्याशी झालेले संभाषण, हत्येच्या दिवशीही संतोष देशमुख यांना कराड याने दिलेली धमकी, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची मागितलेली खंडणी आदी तपासातील बाजू राज्य गुन्हे अन्वेषण, विशेष तपास पथकाकडून न्यायालयात मांडण्यात आल्या. वाल्मीक कराडची परदेशात कुठे कुठे मालमत्ता आहे, याचीही चौकशी करायची असल्याचे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले. वरील मुद्द्यांवरून वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. त्याला वाल्मीक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी विरोध केला.
Reactions

Post a Comment

0 Comments