मतदारांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे : मीनल साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 11, 2024

मतदारांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे : मीनल साठे

 मतदारांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे : मीनल साठे



माढा,


माढा विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी गेल्या ३० वर्षांपासून एकहाती झालेले सत्तेचे केंद्रीकरण मोडून काढून सत्तेचे विकेंद्रीकरण करत या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी= घडाळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार अॅड. मीनल साठे यांनी पटवर्धन कुरोली येथील जाहीरसभेत बोलताना केले.


साठे यांनी रविवारी पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी, पेहे नांदोरे, आवे, पटकुरोली, देवडे, खेडभोसे, पिराचीकुरोली या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पटवर्धन कुरोली येथील सभेत बोलताना त्या
म्हणाल्या की, निवडणुकीमध्ये मी या मतदारसंघातील माढा तालुक्यातील ७८, माळशिरस तालुक्यातील
१४ व पंढरपूर तालुक्यातील ४२ पेहे गावांकडे स्वतःच्या गावाप्रमाणे लक्ष देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे. महायुतीने मला एक लाडकी बहीण म्हणून उमेदवारी दिली. मी या मतदारसंघातील सर्व भावांना विनंती करते की, येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दावून मला विक्रमी मतदान करून विजयी करावे.


देवडे, खेडभोसे, पिराचीकुरोली या ठिकाणीदेखील प्रचारसभा पार पडल्या. या सभेसाठी शिवसेनेचे
तालुका उपप्रमुख बाळासाहेव पाटील, उपसरपंच शैलजा तवटे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दाजी चंदनकर, समाधान पाटील, शिवसेनेचे सिध्देश्वर नाईकनवरे, अमोल गाढवे, सुवर्णा पाटील, वैशाली चंदनकर, रमेश तवटे, प्रहार अपंग संघटनेचे नामदेव खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील, सामाजिक कार्यकर्ते रहीम शिकलकर, तेजस गायकवाड, रविराज भिंगारे उपस्थित होते. वादलकोट येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार मीनल साठे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी मारुती मदने, दिलीप पाटील, संभाजी पाखरे, पोपट शेजवळ, पोपट नाईकनवरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages