राणी लंके यांना पाठिंब्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ !
बिनशर्त पाठिंबा देत मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही
पारनेर (कटूसत्य वृत्त):- महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पाठिंबा देण्यासाठी विविध गावांतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची रीघ लागली असून रविवारी घाणेगांव, यादववाडी तसेच टाकळी ढोकेश्वर येथील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत राणी लंके यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. दरम्यान, यापूवही काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लंके यांना पाठिंबा जाहिर केला असून पुढील काही दिवसांत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते लंके यांची साथ देणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूकीत आमदार नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी केली व निवडणूक जिंकलीही. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासारख्या बलाढय उमेदवाराला धुळ चारीत लोकसभेत पोहचलेल्या खा. नीलेश लंके यांना त्यांच्या पारनेर-नगर मतदारसंघात रोखण्यासाठी विखे यांच्याकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. विखे यांनी याच मतदारसंघावर
0 Comments